हत्येच्या आरोपात होता न्यायालयीन कोठडीत..
हत्येच्या आरोपात न्यायालयीन कोठडीत असलेला जवाहरनगर येथील 35 वर्षीय कैदी घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 13 मध्ये उपचार घेत असताना आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती.
इम्रान बेग नासिर बेग वय-32 (रा.जवाहरनगर, औरंगाबाद )
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, इम्रानवर हत्येचा आरोप आहे.तो सध्या हर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात होता.छातीत दुखत असल्याची तक्रार त्याने जेल प्रशासनाकडे केली होती.त्यानंतर त्यावर घाटी रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 13 मध्ये उपचार सुरू होते.आज सकाळी 5.55 वाजेच्या सुमारास त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत घाटी रुग्णालयातून पळ काढला या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात आरोपी इम्रान विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली आहे.