कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. दोनच दिवसांवर विसर्जन येऊन ठेपले आहे.
विसर्जनाच्या दिवशी शहरातील 11 विहिरींवर गर्दी होण्याची शक्यता पाहता त्यातून संसर्ग वाढण्याची भिती असल्याने मनपाने 11 विहिरींसह शहरातील 9 प्रभागांमध्ये 27 ठिकाणी गणेशमूर्ती संकलन, विसर्जनाची व्यवस्था केली आहे.विसर्जन मिरवणुकीत गर्दी होऊ नये यासाठी 144 कलम लावण्यात आले आहे. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी बैठक घेऊन ज्योतीनगर येथील कृतिम तलाव तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेतर्फे प्रत्येक वॉर्डातील ठरावीक जागेवर गणेशमूर्ती स्वीकारल्या जाणार आहेत. गणेश विसर्जन विहिरींव्यतिरिक्त प्रत्येक प्रभागात ‘गणेश मुर्ती संकलन वाहन’ असे फलक लावलेली वाहने उभी असतील. एकूण 23 जागांवर अशी सोय केली जाणार आहे.