‘अब ये आलम है की, छीक भी आ जाए तो दुनिया गौर से देखती है’

Foto
औरंगाबाद :आपले कविवर्य , केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची ’गो कोरोना , कोरोणा गो ’ हि कविता सध्या प्रत्येकाच्या ओठी चर्चेचा विषय आहे. त्यांच्या या कवितेनंतर सोशल साईट्सवर वादळ आले आहे .या गो कोरोणा वर अनेक रिमिक्स गाणी, मिम्स बनवण्यात आले. यावर आठवले पुन्हा एकदा म्हणाले, ’ कोरोना गो, ये मेने दिया था नारा, इससे जाग उठा भारत सारा , कोरोना जैसे चमक रहा है 129 देशो मे तारा, एक दिन बजा देंगे कोरोणा के बारा ’ .
सध्या कोरोणाने भारतातहि शिरकाव केला आहे. संपूर्ण जगात भारतच एकमेव देश आहे जेथे कोरोणा सारख्या रोगावर लोकं विनोद करत आहेत.कदाचित  दुख सुद्धा आनंदाने झेलणे हिच आपली भारतीय संस्कृती असल्यामुळे असे होत असावे.
जगभरात कोरोनामुळे आत्तापर्यंत 6443 मृत्यू झालेत. भारतात आत्तापर्यंत 108 लोकांना कोरोणाची लागण झालेली आहे. महाराष्ट्रातील काही शहरांमध्येही कोरोनाची लागन झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर नजर टाकता  भारतात ’ कोरोना ’ सारख्या भयंकर रोगावर होणारे विनोद पोट धरून हसायला लावत आहेत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील आपल्या ’ गो कोरोना ’ या गाण्यातून सगळ्यांना पोट धरून हसवले. व त्यांच्या याच व्हिडिओने समाज माध्यमांवर अक्षरश: धुमाकूळ घातला. जिकडे तिकडे फक्त आणि फक्त आठवले साहेबांचे गो कोरोणाच दिसत होते. त्यांच्या याच व्हिडिओवरुन वेगवेगळ्या चित्रपटातील काही व्हिडिओंना आठवलेंचा आवाज देऊन ’ गो कोरोना, कोरोना गो ’ या संवादाचे व्हिडिओ बनवणे व व्हायरल करणे सुरूच आहे.पछाडलेला तात्या विंचूपासून भुलभुलैय्या चित्रपटातील मंजुलिकापर्यंत प्रत्येकाच्या ओठी शीघ्रकवी आठवलेंचा ’ गो कोरोना ’ मंत्र नेटकर्‍यांनी खुबीने घातला आहे.
कोरोनावर तयार करण्यात आलेले काही विनोद, जसे ढेरी कमी कशी करायची ? अत्यंत सोपा आणि साधा उपाय सर्वप्रथम सकाळी उठल्यावर  डोळे बंद करायचे आणि म्हणायचे  ढेरी गो.. ढेरी गो...गो ढेरी गो, पूर्वी कुणी एखादी घटना सांगत असताना शिंक आली की सत्य आहे असं म्हणत होते, आता ऊठ म्हणतात ’ .जरा थांबा आता उन्हाळा सुरू झालाय ,हळूहळू  तापमान 43 डिग्री वर गेलं, की कोरोनाच काय करीना पण तुमच्याजवळ फिरकणार नाही.अशे एक ना अनेक विनोद सोशल साईट्सवर धुमाकुळ घालत आहे. येथे प्रत्येकाच्या कल्पना शक्तीला वाव मिळत आहे. असाच एक शायर म्हणतो,
’ बड़ी तन्हा सी बेपरवाह गुजर रही थी जिंदगी ग़ालिब,
अब ये आलम है कि  एक छींक भी आ जाये  तो दुनिया गौर से देखती है ’ या विनोदांप्रमाणेच रवी वाघमारे या गीतकाराने , ’ बाहेरुन आला निघंना केला, सार्‍या लोकांना म्हणतो मरोना, जगात आला नं वाढवा केला असा कसा रोग कोरोणा ’ हे डिजे गीत तयार केले. सध्या तरुणाई या गीतावरच ठेका धरतांना दिसत आहे.पुणेकर आयुष्यात पहिल्यांदाच यानिमित्ताने का होईना म्हणताय, ’ सगळ्या पाहुण्यांना फोन करुन पुण्याला येण्याच निमंत्रण दिलय, परत नको म्हणाय बोलवत नाही म्हणून  - आम्ही पुणेकरोना ’. एकंदरीत नेटकर्‍यांनी हसत खेळत कोरोणाला सामोरे जाण्याचा निर्धार केलेला दिसत आहे.