महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक एस.एस. चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आजच पदभार स्वीकारणार आहेत.
मंत्रालयातील अवर सचिव सीताराम कुंटे यांचे याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.
जिल्हाधिकारी पद श्रेणीत उन्नत करून पदस्थापना करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या बदलीने रिक्त झालेले पद ते स्वीकारतील.