सांजवार्ता जनआरोग्य मोहीम

Foto
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला खो !
प्रशासनाच्या हाताला भरला लकवा
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना रूग्णांवर उपचार करावे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला प्रशासनाने खो दिला आहे. गेल्या महिनाभरापासून याबाबतचे  आदेशच काढले नसल्याने प्रशासनाच्या हाताला लकवा भरला की काय ? असा आरोप होतो आहे.
 कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्य सरकारकडे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय संघटना यासह अनेकांनी मागणी केली आहे. मात्र अजूनही महात्मा फुले योजनेमध्ये कोरोना संसर्ग सामान्य लक्षणांचा समावेश केलेल्या नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यासह आरोग्य विभागाच्या  अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. शहरात नऊ हजारावर कोरोना संक्रमित पेशंट रुग्ण झाले असतानाही केवळ २० रुग्णांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. सर्वसामान्यांना लाखो रुपये रूग्णालयात खर्च करावे लागत आहेत. शासकीय योजनेचा लाभ मिळत नसल्याने संताप व्यक्त होतो आहे. 
मुख्यमंत्र्यांनी धोका दिला : खासदार इम्तियाज 
दोन आठवड्यापूर्वी झालेल्या व्हीडिओ कॉन्फरन्स मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सचिवांना तातडीने आदेश देत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा असे आदेश दिले. तरीही अजून लाभ मिळत नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊ नये जर प्रशासन सर्वसामान्यांना योजनेचा लाभ देत नसेल तर सरकार बद्दल काय बोलावे ? मुख्यमंत्र्यांनीच धोका दिला अशी टीका जलील यांनी केली.