शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे इच्छुक संभ्रमात

Foto

औरंगाबाद :- महानगरपालिका निवडणुक राज्यातील महाआघाडीच्या धर्तीवर लढल्या जातील असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, व शिवसेनेचे नेते जाहिरपणे बोलत आहे. पण कोणाला किती आणि कोणते वार्ड द्यावयाचे याचे धोरणच अद्याप निश्‍चित झाले नसल्याने महाविकास आघाडीतील तिनही पक्षातील इच्छुक कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

राज्यात तीन महिन्यापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या विचारसरणीत जमिन आसमानचा फरक पण भारतीय जनता पार्टीला सत्तेबाहेर टाकण्यासाठी तिनही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून सत्ता काबीज केली. सत्तातंरानंतर राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच काही महानगरपालिकेतील महापौर पदांच्या निवडणुका झाल्या यात महाआघाडीने अनेक ठिकाणी सत्ता मिळविली.

त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका महाआघाडीच्यावतीने लढविण्यात येतील असे आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी जाहिर केले, त्यानुसार औरंगाबाद मनपाची निवडणुक ही महाआघाडीकडून लढण्याचा निर्णय झाला. महाआघाडीच्या स्थानिक नेत्यांची बैठक पंधरा दिवसापूर्वी महापौर बंगल्यावर झाली. या बैठकीत सध्या ज्या पक्षाचे नगरसेवक निवडुन आलेले आहेत. ते वार्ड त्या पक्षाला सोडण्याचा निर्णय झाला. 115 वार्डापैकी शिवसेनेचे 29, काँग्रेसचे 11 व राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य सध्या मनपात आहेत. हे 44 वार्ड त्या त्या पक्षाकडेच राहणार आहेत.

उर्वरित 71 वार्डाचे वाटप व कोणता वार्ड कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हे ठरवायचे आहे. एका बैठकीनंतर जागा वाटपाबाबत बैठक झालेली नाही. सध्या आघाडीतील तीनही पक्षाच्यावतीने 115 वार्डाकरिता इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतले जात आहे. त्यामुळे आघाडी होणार की नाही, झाली तर सध्या सर्व वार्डातून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात येत आहे. ज्यांच्यासाठी वार्ड सुटणार नाही त्या कार्यकर्त्यांचे काय करणार हा प्रश्‍न आघाडीच्या नेत्यांपुढे आहे. असे असले तरी आपणास उमेदवारी मिळेल याची शास्वती उर्वरित 71 वार्डातील इच्छुकांना नाही. त्यामुळे या तिन्ही पक्षातील इच्छुक उमेदवार संभ्रमावस्थेत पडले आहेत. निवडणुकीसाठी आजपासून खर्च करावयाचा पण उमेदवारी मिळण्याची गॅरंटी नसल्याने अनेक कार्यकर्त पक्षाचे अर्ज भरून देण्यासही मागे पुढे करत आहेत. आघाडीच्या नेत्यांनी जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवावा म्हणजे कामाला लागता येईल असे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे. 

जागांची अदलाबदल
सध्या नगरसेवक असलेल्या जागांमध्ये दुसर्‍या क्रमांकावर काही उमेदवार होते. या वेळी ते पुन्हा रिंगणात उतरणार आहे. पण आघाडी झाल्यास अडचणी निर्माण होणार असल्याने पक्षातील काही निष्ठावंत पदाधिकार्‍यांसाठी जागांची अदला बदल तिन्ही पक्षांनी करावी अशी मागणी इच्छुकांमधून होत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker