शिवसेनेचे मिशन मनपा : आतापर्यंत 35 वॉर्डाची तटबंदी!

Foto
नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला
 महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना मिशन मूडवर आली असून नेत्यांच्या टीमने शहरातील 35 वार्ड चा आढावा पूर्ण केला आहे. पक्षाचे इच्छुक उमेदवार, वार्डातील प्रश्न, विरोधी पक्षातील उमेदवाराची ताकद यासह इतर समीकरणावर विचार मंथन झाल्याचे समजते.
राज्यात भाजप सोबत काडीमोड झाल्यानंतर आता महानगरपालिकेत शिवसेनेचा कस लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला घेरले आहे. विकासाच्या मुद्द्याचे आपल्यावर बालंट नको म्हणून भाजप वर्षभरापूर्वीच सत्तेतून पायउतार झाली. त्यामुळे एमआयएम सोबतच आता भाजपचाही सामना शिवसेनेला करावा लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्याचे सूतोवाच वरिष्ठ नेत्यांनी केले आहे. त्यामुळे ज्या वार्डात आपली ताकत आहे ते वार्ड मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे नेते सरसावले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, विकास जैन आदी नेत्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. शिवसेनेची ताकद असलेले वार्ड पिंजून काढले आहेत. इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेत वॉर्डातील समस्या तसेच विरोधी पक्षातील उमेदवारांबाबत चाचपणी करून कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याचे काम या नेत्यांनी केले. जवळपास 35 वार्डातील बैठकांचा सिलसिला पार पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनपात एक हाती सत्तेचा प्रयत्न : खैरे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली असून इच्छुकांच्या मुलाखतींचा सिलसिला सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नेते कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मनपात एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न शिवसेनेचा राहील. प्रत्येक वार्डात च्या समस्या तसेच उमेदवार चाचणीसाठी बैठकांचा सिलसिला सुरू असून आतापर्यंत 35 वार्ड चा आढावा पूर्ण झाला आहे. येत्या आठवडाभरात आणखी काही वार्ड पिंजून काढणार असल्याचे शिवसेना नेते खैरे यांनी सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker