दरवर्षी प्रमाणे यंदाही अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात आली आहे. यंदा मात्र कोरोनाचे सावट पसरल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन मार्गदर्शन देखील घेता आलेले नाही. त्यात अनेकांना ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया विषयी माहितीच नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशात विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. इतकेच नव्हे तर त्यात अनेकांना मराठी माध्यमला प्रवेश घ्यायचा असताना विद्यार्थ्यांकडून इंग्रजी माध्यमला प्रवेश घेतला गेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुदंड भरावा लागत आहे. त्यात माध्यम बदलण्यासाठी ऑप्शन देखील नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
दरवर्षी अकरावी प्रवेशात पारदर्शकता यावी या उद्देशाने ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. यंदा देखील ऑनलाईन पध्दतीनेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहेत. मात्र अनेकांनी अर्ज देखील भरले आहेत. मात्र अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यात मात्र माध्यम मराठी ऐवजी इंग्रजी माध्यमाला प्रवेश घेतला आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना जास्त प्रवेशशुल्क भरण्याची वेळ आली आहे. याशिवाय माध्यम बदलण्याचे ऑप्शन नसल्याने विद्यार्थ्यांना नेट कॅफेवर चकरा मारण्याची वेळ आली आहे.
याशिवाय आता एवढी प्रवेश शुल्क इंग्रजी माध्यमांना भरावी कशी असा देखील प्रश्न गरीब विद्यार्थ्यांना पडला आहे. याशिवाय पुन्हा दुसर्या राऊंडला अर्ज भरावा तर आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश भेटेल का? याशिवाय ज्या शाखेला प्रवेश हवा आहे तो मिळेल का? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. किमान माध्यम बदलण्याचे ऑप्शन द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
अजूनही 23816 जागा रिक्त
अकरावीला मनपा हद्दीतील शहरातील 116 महाविद्यालयातील एकूण 31465 जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहेत. त्यापैकी आतापर्यंत 7649 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर अजूनही 23816 जागा रिक्त आहेत. त्यासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहेत.