विद्यार्थ्यांची ग्रामीण भागातील महाविद्यालयाकडे धाव

Foto
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील अकरावी प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून यंदा 31 हजार 465 जागांसाठी अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. यंदा देखील अनेक विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील महाविद्यालयात धाव घेतली आहे. मात्र नोंदणी केवळ 24 हजार 980 विद्यार्थ्यांनीच केली आहे. 
अकरावी प्रवेशात पारदर्शकता आणण्यासाठी दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने अकरावीला विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात. मागील वर्षी अकरावीला बर्‍याच जागा रिक्त राहिल्या होत्या. बर्‍याच विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात प्रवेश घेतल्याचे दिसून आले. यंदा देखील बरेच विद्यार्थी ग्रामीण भागात प्रवेश घेण्याला प्राधान्य देत आहेत. त्यात शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन काही विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातच अकरावीला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. अकरावीला यावर्षी मनपा हद्दीतील 116 महाविद्यालयात 31 हजार 465 जागा भरण्यासाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहेत. त्यात केवळ 24 हजार 980 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 19 हजार 359 विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे.  एकीकडे कोरोनाचे सावट असल्याने अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरात प्रवेशासाठी आलेले नाहीत. त्यात दुसरीकडे शहरातील बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहेत.