विद्यार्थी आता ‘Yes Sir’ नव्हे तर जय हिंद म्हणणार

Foto

गुजरातमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी दरम्यान यस सर किंवा प्रेझेंट सर ऐवजी जय हिंद किंवा जय भारत म्हणावे असा आदेश गुजरात सरकारने सोमवारी जारी केला आहे. गुजरातचे शिक्षण विभाग, गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संयुक्त निर्देशक बी एस राजगोर यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

वर्ष २०१८ दरम्यान गुजरात शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या कार्याच्या समीक्षेनंतर शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा यांनी हा आदेश दिला. विद्यार्थ्यांना बालपणापासूनच देशभक्तीची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने १ जानेवारी २०१९ पासूनच यावर अंमलबजावणी करण्यातचे निर्देश देण्यात आले आहेत.