एका 44 वर्षीय कंपनी कामगाराने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी वाळूज एमआयडीसी हद्दीतील आंबेलोहळ गावातील टोकि शिवारात समोर आली.आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. बाळासाहेब धोंडीराम धुधाट वय-44 (रा.अंबेलोहळ) असे आत्महत्या करणार्या व्यक्तीचे नाव आहे.
दुधाट हे वाळूज औधोगिक वसाहतीतील कंपनीत कामाला होते.काही दिवसांपासून त्यांचे काम सुटल्याने ते शेती करीत होते.काल संध्याकाळी त्यांनी त्यांच्या मुलांकडून काही पैशे घेतले व मी जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडले मात्र रात्र झाली तरी देखील ते घरी न आल्याने घरच्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही.आज सकाळी पुन्हा त्यांचा शोध घेतला असता आंबेलोहळ येथील टोकि येथील गट क्र 109 मधील अपट्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे दिसले.या बाबत माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे हवलंदार जगदाळे यांनी घटनस्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठविले आहे.मागील काही दिवसांपासून हाताला काम नसल्याने ते आर्थिक चनचणीत होते अशी गावकर्यांमध्ये चर्चा असून त्यांनी आत्महत्या का केली हे स्पष्ठ झाले नाही.या प्रकरणी वाळूज औधोगिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.