औरंगाबाद- संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या स्वप्नील सुरेश शिंदे या समाजकंटकावर कठोर कारवाई करा अशी मागणी औरंगाबाद राष्ट्रवादी युवक कांग्रेसने केली आहे. या मागणीचे निवेदन औरंगाबादचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना देण्यात आले.
अहमदनगर येथे संत
भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करून महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या भावना
दुखावणाऱ्या व दोन समाजात तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न
करणाऱ्या स्वप्नील सुरेश शिंदे या समाजकंटकांवर कायद्याच्या तरतुदीनुसार कठोर कारवाई
करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्याची कोणीही
हिंमत करणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच संत भगवानबाबा
यांची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रा मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होऊन समाजातील शांतता भंग होऊ शकते. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यावर
व त्याला मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी. अन्यथा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन
औरंगाबाद पोलिस आयुक्तांना राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे
देण्यात आले.
याप्रसंगी
राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दत्ता भांगे शहर, जिल्हा कार्याध्यक्ष शेख कयूम अहमद, राष्ट्रवादी सोशल मीडिया मराठवाडा प्रदेश चिटणीस
जावेद खान ,सोशल मीडिया शहर
जिल्हाध्यक्ष विलास मगरे ,आमोल साळवे ,फुलचंद भांगे ,बाबाराम मिसाळ, कृष्णा ढाकणे ,चंद्रकांत बोंगाने ,बाळू चौरे ,सागर जाधव, इस्माईल शेख, महेबुब शेख आदींची यावेळी उपस्थिती होती