जमात ए इस्लामी हिंदची निदर्शने
केंद्र सरकारने लादलेले कृषी बिल परत घ्यावे, अशी मागणी करीत जमात-ए-इस्लामी हिंदने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदने देण्यात आले.
राज्यसभेत साधक बाधक चर्चा न करता कृषी विधेयके घाईघाईने मंजूर करण्यात आली असून त्यामुळे शेतकरी उध्वस्त होणार आहेत. कार्पोरेट जगतातून गुंतवणूक आल्यास शेतकर्यांना लाभ होईल याचा कोणताही विश्वास नाही, या बिला विरोधात देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. पंजाबच्या महिला मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. हे शेतकरी बिल म्हणजे शेतकर्यांची फसवणूक असल्याचा आरोप जमात-ए-इस्लामी हिंदचे शहराध्यक्ष वाजेद कादरी यांनी केला. शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, शेतकर्यांना मोफत बी-बीयाणे खत पुरवठा करावा, शेतकर्यांना बिनव्याजी कर्ज द्यावे, कापसाची हमी भावाने खरेदी करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी शेख मुख्तार, समाजवादी पार्टीचे मोहम्मद ताहेर, वेलफेअर पार्टी चे अब्दुल कादरी, बीआरएसपी चे अरविंद कांबळे, सीताराम बोर्डे, करीमखान खान, अब्दुल रहीम पठाण आदींची अनेकांची उपस्थिती होती.