पूर्ण क्षमतेने सुरु झालेली ‘लालपरी’ अजूनही प्रवाशांच्या प्रतीक्षेत

Foto
फक्‍त 40 % प्रवासी स दसरा-दिवाळीत वाढू शकतात प्रवासी
 कोरोनाच्या अनुषंगाने पन्नास टक्के आसन क्षमतेनुसार एसटी बस सुरू करण्यात आली होती. 18 सप्टेंबर पासून शासन निर्देशानुसार पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. 9 ते 10 दिवसात प्रवासी संख्या वाढेल अशी अपेक्षा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. मात्र 20 दिवसांचा कालावधी लोटूनही प्रवासी भारमान आणि उत्पन्न दोन्ही अतिशय अल्प आहे.तसेच एसटी महामंडळाची आलिशान बससेवा शिवनेरीला देखील अल्प प्रतिसादामुळे 15 दिवसांमध्येच बस्तान गुंडाळण्याची वेळ आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिने शंभर टक्के बंद असलेली बससेवा सामाजिक अंतर राखून 20 ऑगस्ट पासून 50 टक्के आसन क्षमतेनुसार सुरू करण्यात आली होती. त्यामुळे एका बसमधून 22 प्रवाशांचीच वाहतूक केली जात होती.शासनाने आदेश काढून पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरु करण्यास मंजूरी दिली.पूर्वीसारखी प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी आता लवकरच दिसेल.अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र अजूनही एसटी सेवा पूर्ववत झालेली नाही.कोरोनानंतर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे एसटी महामंडळाला बराच मोठा आर्थिक फटका बसला आहे. पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु करुनही उत्तपन्नावर विशेष फरक पडलेला नाही. प्रवास करण्यासाठी कारणेच नसल्यामुळे बस रिराम्याच राहत आहेत. कोरोनामुळे लग्नसमारंभावर मर्यादा आहेत. थोडक्यात आटोपण्यावर नागरीकांचा कल आहे. त्यामुळे लग्नासाठी जाणार्‍या प्रवाशांची संख्याच नाही. मंदिरे, धार्मिक स्थळे, पर्यटन केंद्रे बंद असल्यामुळे देखील प्रवासी संख्या अतिशय अल्प आहे. मुंबई - पुणे, औरंगाबाद - पुणे या मार्गांवर धावणारी शिवनेरी बससेवा देखील अल्प प्रतिसादामुळे पंधराच दिवसात बंद करण्यात आल्याचे मध्यवर्ती बसस्थानकाचे व्यवस्थापक सुनील शिंदे यांनी ’सांजवार्ता’ शी बोलतांना सांगितले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker