हरितालिकानिमित्ताने आज सकाळपासूनच महिलांनी भगवान शंकर महादेवाचे पूजा केली. घरोघरी महिलांनी पूजा करून ओम नमः शिवायचा गजर केला. यावेळी संपूर्ण परिसर भोलेनाथांच्या, बम बम भोलेच्या भक्तिमय रसात शहर न्हाऊन निघाले.
मोठ्या उत्साहात दरवर्षी हरीतालिकाची पूजन केले जाते. हरितालिकानिमित्ताने शहरातील महादेव मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. परंतु यंदा कोरोनाचे सावट असल्याने शहरातील सर्व मंदिर बंद आहेत. त्यामुळे आज महिला मंदिरात जाऊन भोलेनाथांचे दर्शन घेऊ शकल्या नाहीत. अनेकांनी शहरातील महादेव मंदिराच्या बाहेरूनच भगवान शंकर महादेवाचे दर्शन घेतले. यावेळी घरोघरी महिलांनी पारंपरिक पध्दतीने रांगोळी काढून सकाळपासूनच भोलेनाथाचा गजर करून भक्तिमय वातावरणात हरितालिका पूजन केले. हरितालिकानिमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांनी पारंपरिक पद्धतीने भगवान शंकराची पूजा केली. यावेळी पूजा करून णिकल्यासाठी प्रार्थना केली. महिलांनी शंकर महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहून ओम नमः शिवायचा जप केला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला.