संविधान बचाव म्हणत संविधानाची पायमल्ली

Foto
औरंगाबाद :- सध्या देशभर एक वेगळ्याच प्रकारच्या सहिष्णुता धुमाकूळ घालीत आहे. स्वत: घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा ‘..फ्रीडम ऑफ स्पीच चा आज होत असलेला दुरूपयोग आणि त्याच्या नावाखाली सुरू असलेला नंगानाच सहन झाला असता का हा मोठाच प्रश्‍न आहे. नसते शब्दांचे मनोरे उभारण्या आणि एकुणच उदयास येत असणार्‍या शहशतवादाचे समर्थन करणारी मंडळी या दहशदवादाचे आपणही बळी पडू शकतो हेच विसरली आहे असे म्हणावे लागते.
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी काल रविवार ‘संविधान बचाव : पण कोणापासून’ या विषयावरील व्याख्यानात मांडलेल्या मताशी कुणालाही अगदी ठवून सुद्धा असहमत होता येणार नाही आता अगदीच ‘ झोपेचे सोंगच’ घेतले असले तर भाग वेगळा.
‘संविधान बचाव‘ अशी बोंब ठोकणारी मंडळीच संविधानाचा अवमान करीत असल्याचे दिसते. ‘सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी ‘शाहिनबाग’ फुलविण्यात आली आहे. त्यांची मागणी कधीच पूर्ण होऊ शकत नाही. सीएए व एनआरसी हा कायदा भारताच्या सार्वभौम संस्थेने म्हणजे संसदेने सर्वानुमते पास केला आहे. पंतप्रधान मोदी असो की, गृहमंत्री अमित शहा किंवा अन्य कुणी असो आता या कायद्यात बदलू शकत नाही हे भाऊंनी अतिशय ठाम व परखडपणे मांडले ते एका दृष्टीने चांगले झाले. अर्थात ही बाब शाहिन बागेला माहितच नसेल अपेक्षा नाही पण जाणीवपूर्वक एक समाज बुद्धीमंद करण्यात येत आहे. स्वरा भास्कर सारखी ‘अभिनेत्री’ तिच्या इमेजचा वापर जो कायदा अजून अस्तित्वातही नाही त्याबद्दल एका न्यूज चॅलेलवरून एका विशिष्ठ समाजाला भडकविण्याचे प्रयत्न करीत असेल तर अशा ‘फ्रिडम’ चा विचार करण्याची वेळ आली आहे असे म्हटले तर ‘मनुवाद’ ठरणार नाही असे वाटते. कारण सध्या देशहित, समाजहित यापेक्षा एक वेगळाच प्रकारचा देशहित जपण्याकडे कल वाढीस लागला असल्याचे दिसते.
मोदी-शहा, भाजप द्वेशापाई आपण देशाच्या सार्वभौमत्वेला आव्हन देत आहोत आणि त्यामुळे या वत्तीत आपलीही होरपळ होऊ शकते याचे भान बुद्धीवंत म्हणून घेणारेही बाळगणार नसतील तर त्यांना बुद्धीमंत म्हणावे का?  हा प्रश्‍नच आहे. भाऊ तोरसेकर यांनी त्यावर नेमके बोट ठेवले. एका हातात तिरंगा एका आणि एका हातात संविधान घेऊन हा सगळा असंविधानिक प्रकार सुरू असल्याचे निरक्षण त्यांनी मांडले. राष्ट्रहित जनाधार विश्‍वस्थ मंडळातर्फे जनुभाऊ रानडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तोरसेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker