टायर फुटल्याने भरधाव टँकर उलटला

Foto
 रसायन घेऊन जाणार्‍या टँकरचा टायर फुटल्याने धावते टँकर रस्त्यावर पलटी झाल्याची घटना आज पहाटे चारच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावरील पाचोड जवळ घडली. अग्निशमन दल व महामार्ग पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
पहाटे 4 वाजेच्या सुमारास एक मोठे टँकर कारखान्याचे रसायन घेऊन बीडकडून औरंगाबाद शहराकडे येत असताना सोलापूर-धुळे महामार्गावरील पाचोड नजीकच्या मुरमा शिवार जवळ अचानक धावत्या टँकरचा टायर फुटला. चालकांचे नियंत्रण सुटल्याने टँकर पलटी झाले. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनि अग्निशामन दलाला पाचारण केले व रस्त्यावर पडलेले रसायन पाण्याने साफ करून क्रेनच्या साहाय्याने भल्यामोठ्या टँकरला उचलले. वाहतूक सुरळीत केली.वेळीच अग्निशामक दल आणि पोलीसांनी तत्परता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker