नाथसागराचे दोन दरवाजे उघडले

Foto
धरण 97.57% टक्के भरले स सलग दुसर्‍या वर्षी भरले धरण
नाथ सागर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे यावर्षी नाथ सागर जलाशय 97.57% टक्के भरले असून धरणाच्या इतिहासात प्रथमच औरंगाबाद  व पश्चिम महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या जोरावर नाथ सागर जलाशय 97.57  टक्क्यावर येऊन पोहोचला आहे.  आज दुपारी धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातून 100 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. 
पावसाळ्याच्या तीन महिन्यात एकदाही गोदावरी नदीला पूर आलेला नसताना नाथसागर जलाशय जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून धरण100%टक्के भरण्यासाठी फक्त अर्धा फूट पेक्षा कमी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या धरणात 6181 क्यूसेक  आवक सुरू असून आवक पाहता कोणत्याही क्षणी धरण शंभर टक्के  भरण्याची शक्यता आहे .दरम्यान जलविद्युत केंद्रातून गोदावरी नदीच्या पात्रात 1589,उजवा कळवा मध्ये 500,डावा कालवा मध्ये 100 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
आवक वाढल्याने नाथ सागर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे. धरणाच्या इतिहासात नाथ सागर जलाशय सलग दुसर्‍यांदा पूर्ण भरले आहे. नाथ सागर जलाशयाची क्षमता 1522 फूट आहे आज सकाळी6 वाजता धरणाची पाणी पातळी  1521.56फूट एवढी होती.
पाणी पातळी : 463.77 मीटर
एकूण पाणी साठा : 2856.500 दलघमी
जिवंत पाणी साठा : 2118.394 दलघमी
आवक : 6181 क्यूसेक
धरणाची टक्केवारी : 97.57 %
विसर्ग:
जलविद्युत केंद्रातुन : 1589 क्यूसेक
उजवा कळवा : 500 क्यूसेक
दावा कालवा : 100 क्यूसेक
या प्रमाणे विसर्ग सुरू आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker