जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ९६ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या ६५ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही १३६६२ वर जाऊन पोहचली आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंत आढळलेल्या १३६६२ रुग्णांपैकी ९६८० जण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ४६४ रुग्णांचा मृत्यू झाला. तर ३५१८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागात ७३ रुग्ण
ग्रामीण भागात ७३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात औरंगाबाद-६, फुलंब्री-३, गंगापूर -२२, खुलताबाद -८, सिल्लोड-३, वैजापूर-७, पैठण -४, सोयगाव -१२, अंभई सिल्लोड-१, स्नेहवाटिका, सिडको महानगर -१, वाळूज-१, बजाजनगर, वाळूज -१, फुलेनगर, वडगाव-१, आडगाव माडरवाडी, कन्नड -२, टाकळी, खुलताबाद -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
शहरातील २३ रुग्ण
शहरातील २३ रुग्ण आढळून आले आहेत. नागेश्वरवाडी-१, एमजीएम मेडिकल कॉलेज परिसर-३, एन दोन सिडको -२, मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर-१, मार्ड हॉस्टेल-१, खोकडपुरा-१, मिटमिटा -१, प्रबुद्धनगर, पानचक्की परिसर-३, एन सात सिडको -५, शांतीनाथ सोसायटी गादिया विहार-१, साजापूर-१, रोजा बाग -१, आनंदनगर, कोटला कॉलनी-१, फरहादनगर, जटवाडा रोड-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.