श्रीनगरमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार

Foto
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सुरक्षा रक्षकांसोबत त्यांचा अनेकदा आमना-सामना होऊन चकमकीही घडत आहेत. आज (गुरुवार) सकाळी श्रीनगरमध्ये अशीच एक चकमक झाली. 
यामध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे वृत्त आहे. एएनआयने याबाबत माहिती दिली आहे. काश्मीर झोन पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीनगरच्या बाटमालू भागात आज सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना सडोतोड प्रत्युत्तर दिलं. यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. या ठिकाणी शोध मोहिम अद्यापही सुरु आहे