जिल्ह्यातील आज सकाळी आलेल्या अहवालानुसार पहिल्या टप्प्यात ६६ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ९५१० झाली आहे.
सकाळी आलेल्या अहवालात परीक्षण केलेल्या १००५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत ९५१० कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५४९९ बरे झाले, ३७० जणांचा मृत्यू झाला. तर ३६४१ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
शहरात २१ रुग्ण
शहरात २१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात न्यायनगर, गारखेडा १, संसारनगर १, कांचनवाडी १, छावणी १, एन बारा सिडको १, पीरबाजार उस्मानपुरा १, एन चार सिडको २, बेगमपुरा ३, प्रथमेशनगर, बीड बायपास, देवळाई रोड १, इतर १, एन अकरा हडको ३, चिकलठाणा १, जयभवानीनगर १, पीर बाजार १, शिवनगर १, मिल कॉर्नर १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागात ३१ रुग्ण
ग्रामीण भागात ३१ रुग्ण आढळून आले. ते रुग्ण रांजणगाव २, पोस्ट ऑफिस जवळ, गंगापूर १, अक्षदपार्क,कुंभेफळ १, करमाड १, मोठी आळी, खुलताबाद ३, पळसवाडी, खुलताबाद ६, वेरूळ २, मोरे चौक, बजाजनगर २, आयोध्यानगर, बजाजनगर ४, राधाकृष्ण सोसायटी तनवाणी शाळेजवळ, बजाजनगर १, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाजनगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर १, म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाजनगर १, जय भवानी चौक, बजाजनगर २, गोंडेगाव, सोयगाव २, शास्त्री नगर, वैजापूर १ या भागातील कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत














