जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ९१ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही १९४९८ गेली आहे.
आज सकाळी नवीन ९१ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण १९४९८ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत १४६८९ जण बरे झाले तर आजपर्यंत ६०८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या ४२०१ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
ग्रामीण भागात ५६ रुग्ण
आज सकाळी पहिल्या टप्प्यात ग्रामीण भागात ५६ रुग्ण वाढले आहेत. त्यात साजापूर-१, नागद-१, वडगाव-२, स्वामी समर्थनगर, बजाजनगर-१, बजाजनगर -४, लेननगर, वाळूज-१, बाप्तारा, वैजापूर-६, लासूर स्टेशन, गंगापूर-१५, साजातपूर, वैजापूर-१, पळसगाव, वेरूळ-१, परदेशीपुरा, पैठण-३, नवीन कावसान, पैठण -१, पिशोर, कन्नड-१, गंगापूर-१, गणपती गल्ली, गंगापूर -८, जयसिंगनगर-१, आंबेडकर चौक, वैजापूर-१, परदेशी गल्ली, वैजापूर-१, लक्ष्मीनगर, वैजापूर-१, परदेशी माढी, वैजापूर-१, दर्गाबेस, वैजापूर-१, पोलिस कॉलनी, वैजापूर-२, दुर्गावाडी, वैजापूर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
शहरात ३५ रुग्ण वाढले
शहरात ३५ रुग्ण वाढले आहेत. त्यात शताब्दीनगर-१, सिल्क मिल कॉलनी-१, पन्नालालनगर-१, इतर-१, पदमपुरा -१, स्नेहनगर-२, रेणुकानगर-१, सूर्यदीपनगर-३, नक्षत्रवाडी-१, गारखेडा -१, एन अकरा, सूदर्शननगर -१, एन आठ, सिडको -१, कॅनॉट प्लेस -१, बजाजनगर-१, श्रीकृष्णनगर-१, एन सहा, अविष्कार कॉलनी-१, राधामोहन कॉलनी-२, महेशनगर-१, एसटी कॉलनी -१३ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.