म्हैसमाळ बंद असल्याने पर्यटकांची निराशा

Foto
कोसोमैल जाऊन पर्यटनस्थळ न पाहताच परतले पर्यटक
 कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याकाळात सर्व पर्यटन स्थळे, रेल्वे, बस सह आदी सर्वच बंद करण्यात आले होते. अनलॉक झाल्याने हळूहळू सर्व पूर्व पदावर येत आहे. मात्र अद्यापही पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आले आहे. मराठवाड्यातील थंड हवेचे समजले जाणारे ठिकाण म्हैसमाळ देखील बंद असल्याने पर्यटक निराश झाले आहेत. प्रतिदिन पर्यटक म्हैसमाळ उघडले की नाही ते पाहण्यासाठी चकरा मारत आहेत. कोसो मैल जाऊन देखील मैसमाळ चे गेट बंद दिसल्याने पर्यटकांना निराश होऊन परतावे लागत आहेत. असेच दृश्य शनिवारी आणि रविवारी दिसुन आले. 
कोरोनाची भीती अजूनही संपलेली नाही. मात्र कोरोनाला बरोबर घेऊन नागरिक आता सर्व काळजी घेऊन काम करायला लागले आहेत. त्यामुळे हळूहळू सर्व पूर्व पदावर येत आहे. इतर राज्यातील पर्यटन स्थळे उघडण्यात आले आहे. मात्र आपल्याकडे अजूनही पर्यटन स्थळे बंद आहेत. त्यामुळे पर्यटक निराश होत आहे. असेच चित्र म्हैसमाळ येथील पर्यटन स्थळी दिसून येत आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने शेकडो पर्यटक म्हैसमाळ येथे भेटी देण्यासाठी गेले असता गेट बंद दिसल्याने पर्यटक निराश झाले. लॉकडाऊन नंतर म्हैसमाळ या रम्य ठिकाणी अनेकांचे पाय वळू लागले आहेत. एकतर आधीच खुलताबाद ते म्हैसमाळचा रस्ता अत्यंत खराब आहे. असे असताना देखील कोसो मैल खडतर रत्यावरून अनेक पर्यटक म्हैसमाळ या ठिकाणी भेटी देत आहेत. म्हैसमाळ पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र म्हैसमाळचे गेट बंद असल्याने निराश होऊन परतण्याची वेळ पर्यटकांवर येत आहे. कोरोनामुळे या सर्व गोष्टीला ब्रेक लागला होता. लॉकडाऊननंतर पुन्हा पर्यटक मोठ्या संख्येने म्हैसमाळकडे वळत आहे. मात्र अद्यापही म्हैसमाळचे गेट बंद असल्याने बाहेरूनच पर्यटकांना फोटो काढून निराश होऊन परतन्याची वेळ आली आहे.
आपल्याकडील पर्यटन स्थळे बंद का?
औरंगाबाद शहर हे पर्यटनाची राजधानी आहे. याठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक देश विदेशातून येतात. शहरातील हजारो पर्यटक देखील पर्यटन स्थळांना भेटी देतात. त्याचा फायदा अनेकांना होतो. मात्र अनलॉक होऊनही पर्यटन स्थळे बंद आहेत. इतर राज्यामध्ये लॉकडाऊन नंतर पर्यटन स्थळे उघडण्यात आले आहेत. परंतु आपल्याकडील पर्यटन स्थळे बंद का? असा प्रश्न पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker