चांगले दिवस नक्की येतील'...शिक्षक दरबारात आमदार विक्रम काळे यांचे मत.

Foto
औरंगाबाद :-  कधी नव्हे तर एवढे जी.आर. गेल्या पाच वर्षात शिक्षण क्षेत्राला बघायला मिळाले आहे. या आदेशापैकी एक जीआर शिक्षकाच्या फायद्याचा ठरला नाही. आता सत्तांतर होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शिक्षणाला अच्छे दिन नव्हे तर चांगले दिवस नक्की येतील असा विश्वास शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला.

 राष्ट्रवादी शिक्षक संघातर्फे चेलीपूरा येथील माध्यमिक शिक्षण विभागात  शिक्षक दरबार भरविण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद, चेलीपुरा येथील सभागृहाचे नुतनीकरण करुन या सभागृहास यशवंतराव चव्हाण सभागृह असे नाव देऊन या सभागृहाचे उद्घाटन आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी.चव्हाण, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणो
पाटील, अधिक्षक दिलिप जऊळकर, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, महेश उबाळे, गोविंद गोंडे व लेखाधिकारी यांच्यासह जिल्हयातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पुढे बोलताना विक्रम काळे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांची वैद्यकिय देयक प्रलंबीत आहेत, ती देयके निकाली काढावीत. खाजगी शाळांच्या विनाअनुदानीत शिक्षकांचा प्रश्न भेडसावत आहे. आमच्या सरकारने याच शाळांना शंभर टक्के अनुदान दिले होते. परंतु भाजप सरकारने काही जाचक अटी टाकून शाळांना फक्त वीस टक्केच अनुदान दिले. त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शंभर टक्के अनुदान मिळण्याची मागणी शासन दरबारी करण्यात येत आहे. तसेच वीस टक्के अनुदान प्राप्त शाळेला प्रचलित नियमानुसार अनुदानाची कारवाई करण्यात यावी, अशी आग्रहाची मागणी मी सभागृहात मांडत आहे. डीसीपीएस धारक शिक्षकांना शासनाचा निधीसह पावत्या देणे, शिक्षकांना सेवा पुस्तिकेच्या दुय्यम प्रत देणे, शाळांच्या संचमान्यता, नैसर्गिक वाढ वर्ग तुकडया, अघोषित शाळा यासह अनेक वैयक्तिक व सामुहिक प्रश्नांवर चर्चा यावेळी करण्यात आली. जुन्या पेंशन योजनेसाठी असलेल्या जाचक अटी हटवून एक नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रविंद्र तम्मेवार यांनी केले. सुरेखा शिंदे यांनी आभार मानले. या प्रसंगी वाहेद शेख, रविंद्र खोडाळ, सचिन बोर्डे, दिलिप कोळी, एस.टी.शिंदे, विजय द्वारकुंडे, आसाराम शेळके, वाल्मिक सुरासे, शिवराम म्हस्के, शिवाजी बनकर, दिलिप वडजे,  शाहुराज मुंगळे,  प्रल्हाद शिंदे, यांच्यासह मोठया संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती.
Attachments area