एसटी प्रवाशांच्या प्रतीक्षेत

Foto
पाच महिन्यांच्या खडतर लॉकडाऊन नंतर 20 ऑगस्ट पासून एसटीची चाके रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे.मात्र कोरोनाच्या भितीने प्रवाशांनी बसकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. एसटी सुरु होऊन दोन दिवस उलटूनही हवा तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने वेळापत्रकानुसार नव्हे तर प्रवाशांच्या मागणीनुसार बस सोडण्यात येत आहेत.आज (दि.22)गणेशोत्सवामुळे सकाळच्या सत्रात तर प्रवाशांची संख्या अतिशय कमी असल्याची माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार प्रमुख एस. ए. शिंदे यांनी दिली. 20 व 21 ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये मध्यवर्ती बसस्थानकातून झालेल्या फेर्‍यांमधून 1 लाख 13 हजार एवढे उत्पन्न झाले.तर सिडको बसस्थानकातून 68 हजार 835 रुपये एवढे उत्पन्न मिळाले.शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याच्या दृष्टीने एका बसमध्ये केवळ 22 प्रवासी बसु शकतात. त्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागत आहे.