जब मिल बैठे दो खासदार पाच आमदार ! जरा उशीरच झाला ना सरकार !!

Foto
तब्बल तीन महिन्यानंतर आणि शहरात कोरोना संसर्ग टिपेला पोहोचल्यावर शहरातील लोकप्रतिनिधी जागे झाले. खासदार इम्तियाज जलील यांच्या आवाहनावरून सुभेदारी विश्रामगृहावर दोन खासदार आणि पाच आमदारांनी सोशल डिस्टंसिंग पळून विचारमंथन केले. कोरोनाविरुद्ध पक्षविरहित लढा उभारण्यावर सर्वांचे एकमत झाल्याचे समजते.
 मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात कोरोना ची लागण सुरू झाली. महिनाभर मर्यादित असलेला संसर्ग मे महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर वाढला. नेमक्या याच काळात शहर राजकीय नेतृत्वाविना होते. शहरातील दोन खासदार, सहा आमदार प्रशासनावर वचक राखण्यात कमी पडले. पर्यायाने संसर्ग आटोक्यात आणला गेला नाही.
 आज तीन तास विचार मंथन !
 दरम्यान, खा. इम्तियाज जलील यांच्या आवाहनावरून आज सुभेदारीवर दोन खासदार आणि पाच आमदारांची बैठक पार पडली. खा. इम्तियाज जलील,, खा. डॉक्टर भागवत कराड, आ. प्रदीप जैस्वाल, आ.अतुल सावे, आ. अंबादास दानवे, आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट यांची या बैठकीला उपस्थिती होती. विविध पक्षांच्या या लोकप्रतिनिधींनी कोरोना संकटावर जालीम उपाय शोधण्यासाठी विचारमंथन केले. तब्बल तीन तास ही नेते मंडळी चर्चा करत होती. कोरोना विरुद्ध पक्षविरहित लढा उभारण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे समजते.