मोबाईल स्वॅब टेस्ट चे रुग्ण नेमके कुठे राहतात? पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडेवारीचा गोंधळ कायम

Foto
एकीकडे जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा पहाता प्रतिदिन वाढत चालला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ही नऊ हजार पार जाऊन पोहचली आहे. त्यात दुसरीकडे मात्र १० तारखेपासून शहरातील विविध भागात अँटीजेन टेस्टद्वारे स्वॅबटेस्ट घेण्यात येत आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंट आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाद्वारे स्वॅब टेस्ट केली जात आहे. मात्र यामध्ये मोबाईल स्वॅब कलेक्शनद्वारे जे आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल गुलदस्त्यात असल्याने आकडेवारीचा गोंधळ कायम असल्याचे दिसून येत आहेत. 

मोबाईल स्वॅब कलेक्शनद्वारे आलेल्या पॉझिटिव्ह रुग्ण नेमके कुठे राहतात? याविषयी ची माहिती गुलदस्त्यात असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तर समोर येत आहेत, परंतु ते रुग्ण राहतात कुठे? कुठल्या भागातील रुग्ण आहेत? याविषयी माहिती मनपा समोर येत नसल्याने मोबाईल स्वॅब टेस्ट चे रुग्ण नेमके कुठले? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित होताना दिसत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत रुग्णसंख्या बरोबर दिसून येते परंतु काही रुग्ण नेमके राहतात कुठे? याची माहिती न मिळाल्याने आकडेवारीचा गोंधळ उडताना दिसून येत आहे. 
हे रुग्ण राहतात कुठे?
मोबाईल स्वॅब कलेक्शनद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या समोर येत आहेत. परंतु हे रुग्ण कुठे राहतात? याविषयी माहिती समोर येत नसल्याने नागरिक देखील संभ्रमात सापडले आहे. १० तारखेपासून सुरू झालेल्या अँटीजेन टेस्टद्वारे स्वॅबटेस्ट घेण्यात येत आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंट आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाद्वारे स्वॅब टेस्ट घेण्यात येत आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ११४ रुग्ण कुठे राहतात? याविषयी माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे माहितीची लपवा-छपवी का सुरू आहे? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. 
११४ रुग्ण राहतात कुठे?
आतापर्यंत १० तारखेपासूनचा आजपर्यत चा कोरोनाचा अहवाल पाहिला ११४ जण पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. परंतु ते राहतात कुठे? याविषयी माहिती समोर आलेली नाही. त्यात अँटीजेन टेस्टद्वारे स्वॅबटेस्ट मध्ये सिटी एंट्री पॉइंट आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाद्वारे स्वॅब टेस्टमध्ये १४ तारखेला आलेल्या दुपारनंतर च्या अहवालानुसार ९० जण पॉझिटिव्ह आले होते. त्यात २५ रुग्ण शहर तर ६३ रुग्ण ग्रामीण भागातील असे एकूण ८८ रुग्णांचे पत्ते देण्यात आले होते. परंतु २ रुग्ण कुठले आहेत? याविषयी माहिती मिळालेली नाही. याशिवाय १५ तारखेला पहिल्या टप्प्यात आलेल्या अहवालानुसार ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. त्यात २१ रुग्ण शहर तर ११ रुग्ण ग्रामीण असे एकूण २८ रुग्णांचे ठिकाणाची माहिती देण्यात आली. ११ रुग्ण कुठे राहतात? याविषयी माहितीच नाही. तसेच त्याच दिवशी सायंकाळनंतर २१६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जाहीर केले होते. त्यात देखील ८१ शहर व २३ रुग्ण ग्रामीण आणि सिटी एंट्री पॉइंटचे २५ रुग्ण असे एकूण १२९ रुग्णांची ठिकाण देखील जाहीर केले. परंतु मोबाईल स्वब पथकाद्वारे ८७ रुग्ण पॉझिटिव्ह आले. परंतु ते नेमके कुठे राहतात? त्याची माहिती समोर आली नसल्याने आकडेवारी चा गोंधळ झाला. तसेच आज सकाळी पहिल्या टप्प्यात ६६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यात शहरात २१ आणि ग्रामीण भागात ३१ असे एकूण ५२ पॉझिटिव्ह रुग्णांचे ठिकाण जाहीर केले परंतु इतर सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते रुग्ण कुठे राहतात? याविषयी माहिती समोर आली नसल्याने गोंधळ उडाला. असे एकूण आतापर्यंत १४० रुग्ण नेमके राहतात कुठे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.