महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Foto
तालुक्यातील म्हस्की येथे 31 वर्षीय विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
 मस्की येथील उषा बाबासाहेब सोनवणे (वय 30 वर्षे) ही
आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घरात न दिसल्याने तसेच घरातील व घराचा दरवाजा उघडा असल्याने घरातील मंडळींनी तिचा शोध घेतला; परंतु तिचा तपास न लागल्यामुळे गावातील पोलिसपाटील कृष्णा सोमवंशी यांनी वीरगाव पोलिस ठाण्याला कळविले. 
वीरगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी व पोलिस पाटील व गावकर्‍यांच्या मदतीने शोध घेतला असता सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गावातील हनुमान मंदिर जवळील विहिरीत उषा सोनवणे हिचा मृतदेह  सापडला. तिच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. ही 
महिला मागील काही महिन्यांपासून आजारी होती.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker