सिरपच्या बाटल्यांसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त कटकट गेट परिसरात एनडीपीएसची मोठी कारवाई

Foto
सिरपच्या बाटल्यांसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त कटकट गेट परिसरात एनडीपीएसची मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडेन सिरपच्या ६०० बाटल्या आणि एका कारसह एकूण १० लाख रुपयांचा मुद्देमाल अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (एनडीपीएस) पथकाने शनिवारी (दि. १४) रात्री जप्त केला. कटकट गेट परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कार मालकासह इतर संशयितांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
कटकटगेट येथील सदफ कॉलनीत एका उभ्या कारमध्ये (एमएच ०२ ईझेड ९६६०) कोडेन सिरपचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक
सचिन जाधव आणि उपनिरीक्षक उत्रेश्वर मुंडे यांच्या पथकाने सापळा रचला. झडतीत तीन लाख रुपये किमतीच्या ६०० कोडेन सिरपच्या बाटल्या आणि सात लाख रुपयांची कार असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
96
कुणकुण लागताच मालक पसार
माहिती मिळाल्याने पथक सापळा लावून बसले होते. परंतु बराच वेळ झाल्यानंतरही कुणी आले नाही. त्यानंतर कार मालकाला संपर्क करूनही तो आला नाही. यावरून पोलिस आपल्यापर्यंत पोचल्याचे कार मालकाला लक्षात येताच तो साथीदारांसह पसार झाला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions