छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शिवशंकर कॉलनी परिसरातील राजयोद्धा गणेश मंडळाचा बाप्पा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, वाघ्या-मुरळींचा पारंपरिक जागर, प्रसिद्ध बँडच्या तालावर तरुण-तरुणींचा जल्लोष आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
बाप्पाच्या आगमनानिमित्त छत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने
ढोल-ताशा सलामी देण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत केले. या सोहळ्यास पालकमंत्री संजय
शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक लोहकरे, माजी सभागृह नेता राधाकृष्ण गायकवाड, सुनील सोनवणे, माजी नगरसेवक रविंद्र गांगे, जगन्नाथ कोऱ्हाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अजय दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला. यंदाची १५ फूट उंच आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














