मनपा सर्वसाधारण सभेत गाजले 'रिल्स' पुराण ! एमआयएम आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक युद्ध

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): महानगरपालिका निवडणुकीत रील्सचे वारे जोरात वाहिले होते. पदाधिकारी निवडून आल्यानंतरही हे प्रमाण काही कमी झालेले नाही. एमआयएम पक्षाचे नगरसेवक तथा मनपा विरोधी पक्षनेत्यांनी व्हायरल केलेल्या रील्सवरून सोमवारी (दि.२७) मनपा अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजप-शिवसेना नगरसेवकांनी चांगलेच घेरले. रील्सवर मत, प्रतिक्रिया देताना पदाधिकाऱ्यांच्या आतील 'शायर' जागा झाला. रील्समधून शिवीगाळ करणे, दहशत पसरविण्याऐवजी त्याचा पॉझिटिव्ह वापर करून जनजागृती करण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिला.
सभेत विरोधी पक्षनेत्यांनी शेर सादर
करून सुरुवात केली.
त्यास उपमहापौरांनीही शेरमधून उत्तर दिले. तर महापौरांनीही शेर सादर केला. सभा सुरू असताना मनोज गांगवे यांनी नदीवर कविता सादर केली. नगरसेवक प्रमोद राठोड यांनी पॉझिटिव्ह संदेश देणारे रील्स बनवावे, शहरातील नागरिकांमध्ये कर भरणा करण्याबाबत जनजागृती करावी, असा टोला विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजीद यांना लगावला. विरोधी पक्षनेत्यांनी
रिल्सद्वारे नागरिकांना महापालिकेचे कर भरण्याबाबत आवाहन करावे, मात्र ते त्यावर रील्स बनवत नाही, त्यांच्या रील्सला चांगले व्ह्यूज आणि लाईक्स येतील, असे नगरसेवक राजगौरव वानखेडे म्हणाले. तर रील्स कशी बनते व त्यात कोणती कामे व काय बोलले पाहिजे, याबद्दल दादांना सांगा, असे विरोधी पक्षनेते अब्दुल समीर साजीद यांनी उपमहापौर जंजाळ यांना उद्देशून म्हणाले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions