'त्या' विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत; प्राचार्य उद्या सादर करणार अहवाल

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) हतनूरच्या राष्ट्रीय महाविद्यालयाचे केंद्र रद्द झाल्यानंतर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कन्नड येथील दोन्ही केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. तसेच राष्ट्रीय महाविद्यालाचे प्राचार्य गुरुवारी (दि.२३) कारवाईचा अहवाल परीक्षा विभागाला सादर करणार आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. बी. एन. डोळे यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी. कॉम. परीक्षेत प्रश्नपत्रिका लीक करून व्हायरल केल्याचा प्रकार कन्नड तालुक्यातील हतनुरच्या राष्ट्रीय महाविद्यालयाच्या केंद्रावर घडल्याचे उघडकीस आला. सदर पेपरची परीक्षा नव्याने होणार असून याप्रकरणी हे परीक्षा केंद्र कायमस्वरूपी तात्काळ रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी दिले. या विषयाची परीक्षा आता ४ मे रोजी घेण्यात येणार आहे. या केंद्रावरील सर्व विद्यार्थ्यांची २१
एप्रिलपासूनची सर्व परीक्षा कन्नड येथील शिवाजी महाविद्यालय व संत तुकाराम महाविद्यालय या केंद्रावर घेण्यात येत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून
या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पेपर डाउनलोड केल्याप्रकरणी संबधित कर्मचारी (संशयित आरोपी) याच्या विरोधात ४८ तासांच्या आत विद्यापीठास अहवाल सादर करावा, असे पत्र सोमवारीच ऑनलाईन पाठविण्यात आले. हतनूरच्या राष्ट्रीय कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. वाघमारे यांची परीक्षा विभागाचे सहायक कुलसचिव भगवान फड व वरिष्ठ सहायक महेंद्र पैठणे यांनी मंगळवारी (दि.२१) सकाळी भेट घेऊन विद्यापीठाची नोटीस दिली. या प्रकरणी संबंधीतावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन आजपर्यंत केलेल्या सर्व कारवाईचा अहवाल २३ एप्रिलपर्यंत विद्यापीठात सादर करण्याचेही सांगण्यात आले. संबंधित महाविद्यालयाने अंतर्गत समिती स्थापन करुन तात्काळ चौकशीही सुरू केली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions