सिल्लोड, (प्रतिनिधी) : व्यस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांना मार्फत आगार प्रमुख संबंधित अधिकारी एसटी महामंडळ सिल्लोड यांना १२ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे नको याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामार्फत महिलांसाठी प्रवास सवलतीसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्यात येत आहे. ही योजना स्तुल्यअसली तरी बारा ते ६५ वयोगटातील सर्व महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे नको, यावर पुनर्विचार करण्यात यावा वरील बाबीचा विचार करून खालील मागण्या करण्यात येत आहे.
१२ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावीआधार कार्ड ओळखपत्राच्या आधारे सवलतीचा विचार करून महिलांना सुविधा सुरू ठेवावी. आपण या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून महिलांना सोयीस्कर व सुलभ अशी व्यवस्था उपलब्ध करून द्या अशी अपेक्षा आहे.
यावेळी स्मार्ट कार्ड काढण्यावर महिलांकडून रुपये २५० घेतल्या जात आहे. याचीही नोंद घ्यावी असे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, लखन ठाकूर, जिल्हा समन्वयक युवा सेना रामेश्वर इंडोले, युवा सेना शहर अधिकारी, रामेश्वर जंजाळ, उप तालुकाप्रमुख, शिवा गौर, रामेश्वर काळे, सचिन पाटील, अमोल काळे, शंकर रोटे, सोमीनाथ बडक, विठ्ठल खिल्लारे पदाधिकारी उपस्थित होते.















