भाईगिरीचे रिल्स बनवाल तर थेट जेलवारी सायबर पोलिसांनी गुन्हेगारांची १७४ सोशल मीडिया खाती केली बंद

Foto

छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो): हसूल मध्यवर्ती कारागृहाबाहेरून सुटणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर भाईगिरीचे उदात्तीकरण करणाऱ्या समर्थकांवर आता पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. गुन्हेगारांचे असे व्हिडिओ त्वरित डिलीट न केल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांत मोठी कारवाई करत गुन्हेगारांची व त्यांच्या समर्थकांची तब्बल १७४ सोशल मीडिया खाती बंद केली आहेत.
शहरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात
FIR
गुन्हेगारांचे समर्थक 'एआय' (अख कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करून रिल्स बनवत असल्याचे आणि समाजात
सोशल मीडियावर विशेष नजर
▶ पाच महिन्यांमध्ये गुन्हेगारांचे व्हिडिओ अपलोड करणाऱ्या १७४ सोशल मीडिया खात्यांवर कारवाई करून ती बंद करण्यात आली. रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगारांशी संबंधित समर्थकांच्या सोशल मीडिया खात्यांवर आमची विशेष नजर असून, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.
सोमनाथ जाधव, पोलिस निरीक्षक सायबर ठाणे
भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी ही कठोर मोहीम हाती घेतली आहे.
कारागृह हे गुन्हेगारांची सुधारणा आणि पुनर्वसनाची जागा आहे. मात्र, काही समर्थक कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहनांचे ताफे आणून घोषणाबाजी करत
शक्तिप्रदर्शन करतात. ज्यांनी असे रिल्स, शॉर्ट्स किंवा पोस्ट फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स, व्हॉट्सअॅपवर टाकले आहेत, त्यांनी ते स्वतःहून तत्काळ हटवावेत. अन्यथा कठोर कारवाईचा इशारा कारागृह अधीक्षक खामकर यांनी दिला.