छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जायकवाडी धरणातील पाणीसाठा खालावल्याने नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये सायफन पद्धतीने पाणी घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. यावर तातडीने उपाय शोधण्यासाठी बुधवारी (दि. १०) जायकवाडी येथे मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कॉफर्ड डॅम न फोडता, तांत्रिक बदल करून सायफन पद्धतीनेच धरणातून पाणी उपसा सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
जायकवाडी येथील ठिकाणी आयुक्त जॅकवेलच्या महापालिकेचे अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, कार्यकारी अभियंता दिपेंद्र कोराटे, जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक खलील खान यांच्यासह
वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जॅकवेलसाठी बांधण्यात आलेला कॉफर्ड डॅम फोडण्यावर बरीच चर्चा झाली. परंतु, जॅकवेलची अनेक कामे प्रलंबित असल्यामुळे तूर्तास कॉफर्ड डॅम न फोडता जीव्हीपीआर कंपनीने अॅप्रोच कॅनॉल (समांतर चर) खोदण्याची तयारी करावी, असा निर्णय घेण्यात आला. जायकवाडी धरणातून सायफन पद्धतीने तीन दिवस पाणी उपसा बंद आहे. त्यामुळे नक्षत्रवाडी येथे पाणी आणता आले नाही. कंत्राटदार कंपनीने या ठिकाणी सिमेंट
पाणी उपशाची तयारी पूर्ण
जायकवाडी धरणातील पाणी सायफन पद्धतीने उपसा करण्यास अडथळा येत आहे. सायफन पद्धतीनुसार धरणात टाकण्यात आलेल्या पाइपची लांबी काही अंतराने वाढवता येणार नाही. त्यामुळे या पाइपमधून पाणी आणण्यासाठी व्हॅक्युम पंप बसवून दाब निर्माण करून सायफन पद्धतीनेच पाणी घेण्यावर अधिकाऱ्यांचे एकमत झाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने व्हॅक्युम पंप बसविले असून पाणी उपसा करण्याची तयारी पूर्ण केल्याचे सांगितले.
काँक्रिटची कामे केल्यामुळे गुरुवारपर्यंत शटडाऊन घेतला असून त्यांची कामे पूर्ण होत आली आहेत. शुक्रवारी सकाळी जॅकवेलमधून पाणी सुरू करून नक्षत्रवाडी येथे पाणी घेतले जाणार आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











