छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): येत्या ३० जून रोजी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. या सभेसमोर प्रमुख ३१ प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र, जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर कामासाठी निधी कमी पडल्याने, जिल्हा परिषदेच्या उपकरातून थेट १४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिंदेसेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवत सभेपूर्वीच रणशिंग फुंकले आहे.
राज्यात एकत्र सत्तेत असले तरी, स्थानिक राजकारणात भाजपने शिंदेसेनेला ताटकळत ठेवल्याचा वचपा या सभेत काढण्याची तयारी सदस्यांनी केली आहे. गटनेते पठाडे यांनी जि.प. अध्यक्ष अविनाश
कंत्राटदाराकडे डांबर प्लांट असण्याची अजब अट
विभागप्रमुखांची उपस्थिती अनिवार्य
ग्रामीण भागाच्या विकासाशी संबंधित शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असल्याने, सर्व विभागप्रमुखांनी सभेला उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती सचिन गरड यांनी प्रशासनाला यासंबंधीचे अधिकृत पत्र काढण्याचे निर्देश दिले आहेत.
डांबर प्लांटच्या अटीवरूनही कोंडी
जि.प.च्या इतिहासात पहिल्यांदाच शाळांच्या वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत कंत्राटदाराकडे स्वतःचा डांबर प्लांट असावा अशी अजब अट टाकण्यात आली आहे. यावरून शिंदेसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गट एकत्र येत अध्यक्ष व प्रशासनाची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय, शहरातील जि.प.च्या मालकीच्या कोट्यवधी रुपयांच्या ११ मोकळ्या जागा बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासाठी सल्लागार एजन्सी नेमण्याचा धोरणात्मक प्रस्तावही या सभेत चर्चे ला येईल.
गलांडे यांच्यावर १०० दिवसांतील काम शून्य असल्याचा गंभीर ठपका ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या तिजोरीतील उपकराचा
निधी फर्निचरसाठी वापरण्याऐवजी तो ग्रामीण भागाच्या विकासासाठी वापरावा, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











