पार्टीत रॅप साँगवरून मित्राची हत्या शस्त्राने वार करीत सिमेंट गट्टू घातला डोक्यात; राजीवनगरमधील थरार

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मित्रांसोबत मध्यरात्री रंगलेल्या दारूच्या पार्टीत 'रॅप साँग' कोण चांगले गातो, यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण खुनात झाल्याची घटना समोर आली आहे. वादाच्या भरात मित्रांनीच लाथाबुक्क्‌यांनी मारहाण करत शस्त्राने वार केले आणि नंतर डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एका वीसवर्षीय तरुणाची निघृण हत्या केली. शेखर ऊर्फ पिया देविदास लहाने (वय २०, रा. इटखेडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. २७) मध्यरात्री घडली. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेखर लहाने याचा भाऊ मयूरने (वय २७) दिलेल्या तक्रारीनुसार, शेखर, त्याच्या मामाचा मुलगा श्रीजत आदमाने आणि मित्र जंगले हे शनिवारी रात्री अकरा वाजता रेल्वेस्थानक परिसरातील अनिरुद्ध आराख याच्या घरात मित्रांसह ओल्या पार्टीसाठी जमले. अनिरुद्ध आणि श्रीजत यांच्यात रॅप कोण जास्त चांगले गातो यावरून वाद झाला. यातूनच त्यांनी एकमेकांना मारहाण केली. यानंतर इम्रान पठाण याने 'तुम्ही आमच्या भागात येऊन जास्त मस्ती करता का?
आता तुम्हाला दाखवतो, तुम्हाला खल्लास करतो' असे म्हणत चाकूने श्रीजतच्या डोक्यावर वार केला. त्याने तो चुकवत हातावर झेलला. इतरांनी त्याला खाली पाडून मारहाण केली. दुसरीकडे अविनाश बोर्डे याने शेखरच्या डोक्यावर चाकूने वार केले. आरोपी मंगेश गायकवाड, अजय ऊर्फ कमलेश भूतकर यांनी शेखरच्या डोक्यावर आणि शरीराच्या उजव्या बाजूला चाकूने वार करीत सिमेंटचा गड्डू डोक्यात मारला. यात शेखरचा मृत्यू झाला तर श्रीजत हा जखमी झाला, असे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर सर्व संशयित आरोपी पसार झाले होते.
वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांच्यासह पथकाने रात्रीतून त्यांचा शोध घेऊन अवघ्या सहा तासांत सर्वांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्वांना चार दिवसांची
मंगेश गायकवाड
अजय भूतकर
अविनाश बोर्डे
संतोष जाधव
इम्रान पठाण
अनिरुद्ध आराख
रोहित गायकवाड
दीपक हिवाळे
मंगेश उगले
हे आरोपींना घेतले ताब्यात
मंगेश गायकवाड, कमलेश भुतकर, अविनाश बोर्डे, संतोष जाधव, इम्रान पठाण, अनिरुद्ध आराख, रोहित गायकवाड, दीपक हिवाळे, मंगेश उगले यांच्यासह एक अल्पवयीन (सर्व राहणार राजीवनगर रेल्वेस्थानक परिसर) यांचा संशयित आरोपींत सामावेश आहे. सर्वांना ताब्यात घेतले आहे.
पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, याच घटनेत दुसऱ्या बाजूने अनिरुद्धवर चाकू हल्ला प्रकरणी मृत शेखर ऊर्फ पिया लहाने, श्रीजत अदमाने, प्रथमेश जंगले (सर्व रा. इटखेडा) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा
नोंदविण्यात आला. याप्रकरणी किसन रमेश गुप्ते (वय ४५ रा. रेल्वेस्टेशन, राजीवनगर) यांनी तक्रार दिली. अनिरुद्धवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी श्रीजत आणि प्रथमेश यांना अटक करण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions