छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): नवीन पाणीपुरवठा योजनेच्या नक्षत्रवाडी येथील पंपहाऊसला अचानक गळती लागल्याने आणि त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका निर्माण झाल्याने खबरदारी म्हणून शहराचा पाणीपुरवठा तूर्तास बंद करण्यात आला आहे. कंत्राटदार कंपनीकडून सध्या तेथे तातडीने वॉटरप्रूफिंग आणि इलेक्ट्रिक पॅनलच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण दुरुस्तीसाठी आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागणार असून, त्यानंतरच पंपिंग पूर्ववत सुरू होईल. परिणामी, छत्रपती संभाजीनगर शहराला पुढच्या आठवड्यातच वाढीव पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहराच्या पाणीपुरवठ्याबद्दल
एअरव्हॉल्व्ह बदलून देणार
▶ पाणी पुरवठा बंद झाल्यानंतर नवीन पंपिंग हाऊसची पाहणी करण्यासाठी गेलो असता त्याठिकाणी फ्लो मीटर बंद असल्याचे आढळून आले. फ्लो मीटर बंद राहणे शक्य नाही. त्याचवेळी जलवाहिनीत काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हची तपासणी करण्याची तज्ज्ञांना सूचना केली. त्यानुसार मुख्य जलवाहिनीवरील ८७ एअरव्हॉल्व्हमधील बटरफ्लाय व्हॉल्व्ह पैकी २५ बटरफ्लाय व्हॉल्व्हची झडप बंद राहत असल्याने त्यातून हवा बाहेर पडत नव्हती. हे व्हॉल्व्ह खराब झाले असून कंत्राटदार कंपनीने जलवाहिनीवरीला एअरव्हॉल्व्हमधील बटरफ्लाय व्हॉल्व्ह बदलून देण्याची तयारी दर्शवली असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले.
माहिती देताना आयुक्त अमोल येडगे म्हणाले की, नवीन पाणी पुरवठा योजनेतून शहराला वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. आठ दिवसात साधारणपणे दीडशे एमएलडी वाढीव पाणी शहरात वितरीत करण्यात आले. दररोज २० ते ३० एमएलडी पाणी घेतले जात होते. शहरातील
परिस्थितीमध्ये पाण्याच्या सुधारणा घडून येत असतानाच २४ जून रोजी झालेल्या पहिल्याच पावसात नक्षत्रवाडी येथील नवीन पंपींग हाऊसला गळती लागून इलेक्ट्रिक पॅनलमध्ये पाणी शिरले. त्यामुळे तातडीने शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर मजीप्राच्या तज्ज्ञांना
» सिडको-हडकोला पाणीपुरवठा
शहराला वाढीव पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात १५०० मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधून पाणीपुरवठा सुरू केला जाईल. या डीआय पाइपलाइनची स्वच्छता, हायड्रोलिक चाचणी, गॅपजोडणी, क्रॉसिंगची कामे करावी लागणार आहेत. ज्या ठिकाणी क्रॉसिंग केली ती तात्पुरती काढून हायड्रोलिक चाचणी केली जाईल. त्यानंतरच या जलवाहिनीतून सिडको-हडकोसह चिकलठाणा, रामनगर, मुकुंदवाडी, हसूल-जटवाडा भागापर्यंत पाणी पुरवठा सुरू केला जाणार असल्याचे आयुक्त येडगे यांनी सांगितले.
बोलावून तपासणी करण्यात आली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













