मनपाकडे २५० कोटींची देणी थकली ! थकबाकी फेडण्यासाठी वाढवणार वसुली : मनपा आयुक्त अमोल येडगे

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो)
महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या नाजूक झाली असून, मनपावर तब्बल २५० कोटी रुपयांच्या देण्यांचा डोंगर साचला आहे. दरमहा जीएसटीच्या माध्यमातून मिळणारा ३९ कोटींचा निधी अत्यावश्यक सेवा, वीज बिल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होत आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ८० कोटी आणि कंत्राटदारांचे १३० कोटी रुपयांचे पेमेंट अडकले आहे. ही सर्व थकबाकी
X
अश्पनी संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
XX
फेडण्यासाठी आता पालिकेला उत्पन्न आणि कर वसुली वाढवावी लागणार असल्याचे मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महापालिका
आर्थिक
संकटाशी सामना करीत असून वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे देणी वाढत आहे. दरमहा दहा ते बारा कर्मचारी
सेवानिवृत्त होत आहे. त्यांचे अंश उपदान, रजा रोखीकरण, ग्रॅच्युटी व इतर लाभाची मिळणारी रक्कम थकली आहे. तसेच विविध विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थकली आहेत. ही देणी देण्यासाठी मनपाला मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली वाढवावी लागणार आहे.
खुल्या जागेतून उभारणार निधी सध्या मनपाचे उत्पन्न वाढीसाठी पार्किंग, होर्डिंग, खुल्या जागा भाडेतत्त्वावर देणे यासारख्या मोहीम राबवाव्या लागणार आहेत. पार्किंग, होर्डिंगसाठी नवीन धोरण
सेवानिवृत्तांचे ८० कोटी थकीत
कर थकबाकी ही ३०० कोटीपेक्षा अधिक आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तीन ते चार वर्षांपासून ८० कोटी रुपये थकलेले आहेत. ही रक्कम दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच इतर देणीही द्यावी लागणार आहे. देणी देण्यासाठी २५० कोटीची आवश्यकता आहे. ही रक्कम कराच्या माध्यमातूनच जमा करावी लागणार आहे. त्यासाठीच मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करून त्यांच्याकडे कर वसुलीसाठी पाठपुरावा केला जात असल्याचे आयुक्त येडगे म्हणाले.
राबविले जाणार आहे. मनपाच्या मोकळ्या जागा मोठ्या प्रमाणावर
असून या जागा भाडेतत्त्वावर देण्याचा विचार सुरू आहे.
https:liepaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions