छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ग्रामीण आवास योजनेतील लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मिळवून देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने गतीने घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच अतिक्रमण झालेल्या जमिनीवरील घरे नियमानुकूल करणे आणि घरकुल बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत, असे निर्दे श जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी महसूल व ग्रामविकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल आणि जिल्हा परिषद प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय
गौडा जी. सी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मीन्नू पी.एम, जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाचे सभापती, बालाजी सोनटक्के, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणाचे वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions