कॉल सेंटर फसवणूकप्रकरणी ४३ आरोपींना जामीन मंजूर

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर आर्थिक फसवणूक प्रकरणातील ४३ आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. चिकलठाणा परिसरातील कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून ११६ जणांना अटक केली होती. अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचा दावा करत पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल व अन्य कागदपत्रे जप्त केली होती. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता व आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे.