चीनमधील कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट, ८२ जणांचा मृत्यू, काहीजण आत अडकले

Foto
बीजींग : चीनच्या उत्तर भागातील शांक्सी प्रांतामधील लिउशेन्यू कोळशाच्या खाणीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही कामगार अद्याप खाणीत अडकून पडले आहेत. ही दुर्घटना घडली तेव्हा सुमारे २४७ कामगार  जमिनीखाली असलेल्या खाणीत काम करत होते.

चीनमधील शिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या ही दुर्घटना  शुक्रवारी संध्याकाळी  ७ वाजून २९ मिनिटांच्या सुमारास झाला. रात्रभर  सुरू असलेल्या बचाव अभियानादरम्यान, शनिवारी सकाळपर्यंत २०१ जणांना  सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तर ३८ जण अद्याप खाणीमध्ये अडकलेले आहेत. खाणीत अडकलेल्या मजुरांपैकी काही मजुरांची प्रकृती गंभीर असल्याचे  सांगण्यात येत आहे.

कार्बन मोनॉक्साईड ठरला कारण
दुर्घटनेबाबत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार खाणीमध्ये कार्बन मोनॉक्साईडचा स्तर धोकादायक पातळीवर पोहोचला होता. कार्बन मॉनॉक्साईड हा एक विषारी आणि कुठलाही वास नसलेला वायू आहे. त्यामुळे तो ओळखता येत नाही. त्यामुळे खाणीमधील कामगारांसाठी हा विषारी वायू आणखीनच धोकादायक बनला.

शी जिनपिंग काय म्हणाले
या दुर्घटनेनंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जखमींवर तातडीने उपचार करण्याचे आणि मदत कार्यामध्ये शक्यतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमधून  धडा शिकला पाहिजे आणि अशी दुर्घटना घडू नये यासाठी सर्व विभागांनी वर्कप्लेस  सेफ्टीबाबत सातत्याने सतर्क राहिले पाहिजे, असे आदेश दिले आहेत.