छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शहरासाठी दिलासादायक वृत्त आहे. शहराच्या बहुप्रतिक्षित नवीन पाणीपुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात ४० ते ५० एमएलडी पाणी घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या योजनेतील सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली असून, पुढील महिनाभरात नागरिकांना या पाण्याचा लाभमिळण्यास सुरुवात होईल.
ऐन उन्हाळ्यातही शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून, काही भागात आठ दिवसाआड, तर काही भागाला १० दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने ७५ दललि क्षमतेची ९०० मिमी व्यासाची पाइपलाइन पूर्णपणे कार्यक्षम करण्यासाठी काही कामे करण्यात आली. त्याचा चांगला परिणाम झाला असून, त्यात १५ एमएलडी पाण्याची वाढ झाली आहे. ही वाढ झाल्यामुळे अनेक भागाला पाण्याचा दाब नियंत्रित ठेवून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे बहुतांश भागाला सहा दिवसाआड, तर काही भागाला आठ आणि अत्यंत तुरळक भागाला दहा दिवसाआड पाणी दिले जाते. मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने यात बदल घडवून आणला आहे. दरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने शुद्धीकरण केंद्रात पाणी घेऊन
सातशेची जलवाहिनी बंद
शहराला ४० वर्षापासून पाणीपुरवठा करणारी ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी जायकवाडीपासूनच बंद करण्यात आली आहे. ही जलवाहिनी जीर्ण झाली असून, पाण्याचा दाबदेखील सहन करण्याची ताकद राहिलेली नाही. त्यामुळे ९०० ची पाइपलाइन कार्यान्वित करून ७०० ची जलवाहिनी बंद करण्यात आली आहे.
हायड्रॉलिक चाचणी होणार
नवीन पाणी पुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात मनपाच्या एमबीआरमध्ये पाणी घेऊन १५०० व्या जलवाहिनीतून दिले जाणार आहे. १५०० च्या जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणी करून घेण्यासाठी महापालिका आग्रही आहे. विभागीय आयुक्तांच्या समितीने देखील हायड्रोलिक चाचणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे या जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी करून राहिलेली किरकोळ कामे पूर्ण करण्यात येतील.
पाण्याचा गढूळपणा २ अंशावर आणला आहे. या पाण्यात तुरटी मिसळविण्यात आली आहे. नक्षत्रवाडीतील महापालिकेच्या आणि मजीप्राच्या एमबीआरपर्यंत पाणी आणण्यात आले. परंतु पाणी घेऊन एकदम वितरित करण्याची जबाबदारी मनपा घेण्यास तयार नाही.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











