पोलीस दलात फेरबदल : १४ सहायक निरीक्षकांच्या बदल्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) सुप्रिया पाटील-यादव यांनी शुक्रवारी राज्यभरातील एकूण ४०६ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये शहर पोलीस आयुक्तालय, ग्रामीण पोलीस दल आणि लोहमार्ग (रेल्वे) पोलीस विभागातील १४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
लोहमार्ग पोलिस दलातील प्रशांत गंभीरराव, अमोल देशमुख आणि हणमंत पांचाळ यांची छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. बालाजी शेंडगे यांना नाशिक परिक्षेत्रात, शिवाजी पवार आणि सोमनाथ वाघमोडे यांना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात नियुक्ती देण्यात आली आहे. सचिन बनकर यांची
पुणे लोहमार्ग विभागात बदली झाली आहे. पोलिस आयुक्तालयातील विनायक शेळके आणि मोसीन अली मजहर अली सय्यद यांची छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर अवघड यांची गुन्हे अन्वेषण विभागात, सुनील कराळे यांची दहशतवादविरोधी पथकात, तर मनिषा हिवराळे यांची राज्य गुप्तवार्ता विभागात बदली झाली आहे. ग्रामीण पोलिस दलातील निशा बनसोडे यांची जालना येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात, तर सुनील इंगळे यांची अमरावती परिक्षेत्रात नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान चक्राकार बदली प्रक्रियेत सिटी चौक पोलिस ठाण्याचे मनोज शिंदे आणि दहशतवादविरोधी पथकातील राहुल रोडे यांना विद्यमान पदावरच आणखी एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सुरू असलेल्या कामांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
-
https://epaper.sanjwarta.in/