छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सिडकोतील मथुरानगर भागात नागरिकांकडून जादा पैसे उकळून त्यांना बेकायदेशीर नळ कनेक्शन देणे आणि अधिक दाबाने पाणी मिळवून देण्यासाठी जलवाहिनीत चक्क पत्र्याचा तुकडा अडकवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने २७ मे रोजी केलेल्या रोबोट तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. पथकाने तातडीने येथील चारही अनधिकृत नळ कनेक्शन तोडून पाण्याच्या प्रवाहातील अडथळा दूर केला आहे.
शहरात सध्या १३ ते १५ एमएलडी पाणी वाढले असून दररोज १६५ एमएलडी
४-५ हजारांत अवैध नळ कनेक्शन
▶ परिसरातील काही खासगी लाइनमन अवघ्या ४ ते ५ हजारात अवैध नळ कनेक्शन जोडून देतात. तुमच्या नळाला प्रेशरने पाणी येईल, असा दावा करून हे लाइनमन जलवाहिनीत पत्रा टाकून पाणी अडवण्याचे असे अघोरी उद्योग करतात. महापालिकेच्या कारवाईदरम्यान एकही नागरिक पुढे आला नाही. नागरिकांनी खासगी लाइनमनच्या आमिषाला बळी न पडता महापालिकेकडे रीतसर अर्ज करून अधिकृत नळ कनेक्शन घ्यावे, असे आवाहन अभियंता रोहित इंगळे यांनी केले आहे.
पाणीपुरवठा होत असल्याचा दावा मनपा करत आहे. मात्र, तरीही अनेक भागांत कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर कार्यकारी अभियंता वसंत भोये, उपअभियंता किरण धांडे आणि पथक अभियंता रोहित इंगळे यांच्या पथकाने
अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. मथुरानगरातील तक्रारीनंतर जलवाहिनीच्या आत रोबोट सोडून तपासणी केली असता, एका ठिकाणी लोखंडी पत्रा अडकवून पुढील भागातील पाणी रोखण्यात आल्याचे दिसले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












