शहरामध्ये ४ विवाहितांचा छळ दोन मुली म्हणून छळ

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): हुंड्यासांठी पैशांची मागणी, चारित्र्यावर संशय, आणि मुलगी झाल्याचा रागातून चार विविध छळाच्या घटना शहरात घडल्या.. याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सिडको पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय विवाहितेच्या फिर्यादीवरून पती सतीश टेहरे, सासू चंद्रकलाबाई टेहरे, दीर शेखर टेहरे, जाऊ श्रद्धा टेहरे, नणंद संगीता टाक, सुनिता मुंडे, साधना महाले तसेच नंदई सुरेश टाक व गजानन महाले यांच्याविरोधात
▶ मुलगी झाल्यामुळे २५ वर्षीय विवाहितेने शारीरिक व मानसिक छळ झाल्याची तक्रार दिली. पती इरफान सय्यद, सासरे अकबर सय्यद, सासू अफसर सय्यद, दीर रिजवान सय्यद तसेच नणंद कौसर शेख, नाझेमा शेख, नसरीन सय्यद, आफरीन शेख आणि जरीन शेख यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून तीन लाख रुपये आण असा तगादा लावत ३२ वर्षीय पीडितेला शिवीगाळ, मारहाण करण्यात येवून तिचा छळ करण्यात आला आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती छावणी पोलीस ठाण्यात देवानंद कांबळे, सासू संध्या कांबळे, सासरे यादव कांबळे आणि नणंद माधुरी कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितांच्या छळाच्या घटनांनी कौटुंबिक अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आला. चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ, मारहाण, मानसिक छळ करून घराबाहेर काढल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. सातारा पोलीस ठाण्यात ३० वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार,
पती अमोल घुसळे आणि सासू सुनिता घुसळे यांनी माहेरहून सोने, पैसे व इतर वस्तू आणण्याचा तगादा लावत तिचा शारीरिक व मानसिक छळ करत नांदवण्यास नकार देऊन घराबाहेर काढल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले केला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions