व्यापाऱ्याचा कर्मचारीच निघाला चोर रेल्वेत दागिन्यांची बॅग चोरीला गेल्याचा रचला होता बनाव

Foto
सीसीटीव्हीमुळे भंडाफोड
: छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो)
लाखांच्या दागिन्यांच्या चोरीची तक्रार देणारा सराफा व्यापाऱ्याचा कर्मचारीच चोर निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानिक गुन्हे शाखा आणि मनमाड लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या बनावाचा भंडाफोड केला. याप्रकरणी कर्मचारी नरेश जाट आणि त्याचा साथीदार लक्ष्मण लोढा यांना अटक करण्यात
तपासादरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित बॅग नेताना दिसले. मालकाने फुटेजमधील जुना कर्मचारी लक्ष्मण लोढा याला ओळखले. पोलिसांनी तातडीने पुण्या गाठून लक्ष्मणला ताब्यात घेतले आणि हा कट उघडकीस आला. आरोपींकडून ८० लाख ८४ हजार २९५ रुपयांचे सोन्या-चांदीचे ९१ दागिने आणि रोकड जप्त करण्यात आली आहे. मनमाडचे पीआय राजकुमार पाडवी आणि संभाजीनगर एलसीबीचे एपीआय प्रशांत गंभीरराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आली असून, राजू परिहार हा तिसरा आरोपी फरार आहे.
आरोपी नरेश जाट हा मध्य प्रदेशातील सराफा व्यापारी राजेंद्र चौधरी यांच्याकडे काम करायचा. ३ जून रोजी तो पंजाब मेलने ९१ लाख ३४ हजार रुपयांचे दागिने व रोकड घेऊन जात होता.
ठरलेल्या प्लॅननुसार, ४ जूनच्या पहाटे मनमाड स्थानकावर नरेश बाथरूमला गेला असता, त्याचे साथीदार लक्ष्मण आणि राजू यांनी ती बॅग लंपास केली. यानंतर नरेशने स्वतःच रेल्वे पोलिसांत चोरीची खोटी तक्रार दिली.
https://epaper.sanjwarta.i Powered By: Vrudhee Solutions