छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील हॉटेल्स, हॉस्पिटल्स, मॉल्स आणि कोचिंग क्लासेसमध्ये येणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरात सुरू केलेल्या विशेष तपासणी मोहिमेत धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. अग्निशमन दलाने तपासलेल्या एकूण १९९ बड्या खासगी आस्थापनांपैकी चक्क १७४ आस्थापनांकडे वैध 'फायर एनओसी' (अग्निशमन परवाना)
नसल्याचे आढळून आले आहे. दिल्लीतील एका हॉटेलला लागलेल्या आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर
८ घटनेनंतर महापालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी तातडीने अग्निशमन विभागाची बैठक घेत शहरातील हॉटेल्स, हॉस्पिटल्ससह खासगी आस्थापनांनी अग्निशमन यंत्रणा उभारलेली आहे का, याची तपासणी करण्याचे आदेश दिले. अग्निशमन विभागाने पथके नेमून तपासणी केली असता, अनेकांकडे फायर एनओसी नसल्याचे दिसून आले. त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
२४ आस्थापनांकडेच आढळली 'एनओसी'
तपासणीत २४ हॉटेल्स, रेस्टॉरंट, हॉस्पिटलकडे फायर एनओसी आढळली. मात्र, नूतनीकरण केलेले नसल्याचे आढळून आले. काही ठिकाणी अग्निशमन न यंत्रणा यंत्रणा कालबाह्य झाल्याचे आढळून ८ आले आहे. अशा सर्व आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. तपासणी मोहिमेनंतर अनेकांनी फायर एनओसी घेण्याची तसेच नूतनीकरण करून घेण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांनी दिली आहे.
नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई
शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, हॉस्पिटल आदी आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात त्यांची तपासणी करण्यात आली. फायर एनओसी नसलेल्यांना नोटीस बजावण्यात बजावण्यात आली आहे. त्यानंतरही अनेकांनी एनओसी किंवा नूतनीकरण करून घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया केली नाही, अशा आस्थापनांना दुसरी नोटीस देण्यात यावी, त्यानंतरही नोटीसकडे दुर्लक्ष केल्यास सील करण्याची कारवाई करावी, असे आदेश अग्निशमन विभागाला दिले आहेत.
अमोल येडगे, आयुक्त. मनपा.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions











