पत्र, रोख पारितोषिक देऊन सत्कार
फुलंब्री, (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिल्पकार कै. दगडूजी तोताराम बोरसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ सा. विधायकचा वतीने, न्यू हायस्कूल पाल येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम, दुतीया, तृतीय आलेल्या विद्यार्थी व पालकांचा २७ जून रोजी न्यू हायस्कूल पाल येथील शाळेच्या प्रांगणात गौरव पत्र व रोख पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला आहे.
माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक हर्षल ज्ञानेश्वर जाधव, दुतीया क्रमांक श्रद्धा शंकर गोल्हारे, तृतीय क्रमांक सुनील आजिनाथ लहाने यांनी प्राविण्य मिळवलेले असून उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक गायत्री बाबासाहेब बहादुरे, दुतीया क्रमांक विशाखा सुनील बचुटे, दुतीया क्रमांक कल्याणी राजू सोनवणे यांनी प्राविण्य मिळवलेले आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत जाधव, शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर भगवान जाधव, उपाध्यक्ष कैलास दगडू जाधव, शालेय समिती सन्मानीय सदस्य सारंगधर मारोती जाधव, ग्रामपंचायत माजी उपसरपंच ज्ञानेश्वर तेजराव जाधव त्याचप्रमाणे जगन्नाथ काका जाधव, सुभाष सुलताने, धोंडूराज ढेपले, उत्तम पांडू जाधव, शंकर गोल्लारे, ज्ञानेश्वर सूर्यभान जाधव, एकनाथ इंगळे, सोनवणे मिस्तरी, ज्ञानेश्वर सोनवणे, सुरडकर आदी पाल गावातील ग्रामस्थ तसेच प्रमुख पाहुणे गजानन मरकड, मिटूसिंह बहुरे, देशमुख, मनोज सूर्यवंशी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन करणारे ज्ञानेश्वर बोरसे बाबासाहेब बोरसे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी विद्यार्थी व पालकांचा गौरव पत्र व रोख पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित केले जाणाऱ्या विविध कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी आयोजकाने चटया आणल्या व त्या शाळेकडे सुपूर्त केल्या व तसेच कार्यक्रम दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप आयोजकाने केले.
शिल्पकार कै. दगडूजी तोताराम बोरसे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार आयोजित कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक यांनी अत्यंत उत्कृष्ट असे नियोजन केले, शाळेच्या शेळके मॅडम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले असून शाळेचे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत मोलाचे योगदान दिले.












