छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शारदा मंदिर कन्या प्रशालेच्या एनसीसी ऑफिसर हेमलता पवार यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना चीफ ऑफिसर मेजर ही रँक प्रदान करण्यात आली. ५० महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला ५० महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर सीओ बी. पी. एस. ठाकूर व अॅडम ऑफिसर एओ कीर्ती मुंडले यांच्या हस्ते हेमलता पवार यांना 'मेजर'
रँक लावून सन्मानित करण्यात आले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थिनींमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, देशप्रेम, आत्मविश्वास व सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी हेमलता पवार सातत्याने कार्यरत आहेत. या यशाबद्दल शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. साधना शाह, प्रशालेच्या मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे, उपमुख्याध्यापिका अनुराधा पांडे, पर्यवेक्षिका सविता पवार तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांनी हेमलता पवार यांचे अभिनंदन केले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions














